आंबोलीत ट्रक दरीत कोसळला ...!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 14, 2024 08:43 AM
views 1178  views

सावंतवाडी : आंबोली घाटात अवजड वळणावर ट्रक पलटी झाला आहे, ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सदर अपघात झाला आहे. यावेळी ट्रक थेट आंबोली घाटात कोसळला आहे. आज पहाटे 6.30 वाजता अपघात झाला. या ट्रक मध्ये चालक अडकून पडला होता. अखेर या घटनेनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.