शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 17, 2026 12:06 PM
views 22  views

देवगड : शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयामध्ये प्रथम तीन क्रमांकावर यशाची मोहर उमटविण्याचा मान यावेळी मुलींना मिळाला आहे.

एप्रिल २०२६ मध्ये पार पडलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या परिक्षेत पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे ३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी सर्वजण उत्तिर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयातून शिवानी नलावडे हीने ८.९३ सीजीपीए गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. साक्षी शिद्रुक हिने ८.७६ सीजीपीए गुण तर श्वेता चव्हाण हिने ७.५८ सीजीपीए गुण मिळवत अनुक्रमे व्दीतीय व तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्राचार्य समिर तारी, सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.