
सावंतवाडी : सुरश्री संगीत ग्रुप सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'स्वरोत्सव' या विशेष संगीत मैफिलीत पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. आज रविवार दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे ही मैफल रंगणार आहे.
सुरश्री संगीत ग्रुपतर्फे गेल्या वर्षभरात विविध संगीत कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना सावंतवाडीसह बाहेरील संगीत रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. याच प्रतिसादातून 'स्वरोत्सव' या अभिजात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रश्मी मोघे यांना तबला साथ निरज भोसले, हार्मोनियम मंगेश मेस्त्री तसेच पखवाजा मनीष तांबोसकर साथसंगत करणार आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भावपूर्ण नाट्यसंगीताच्या विविध रंगांनी सजलेली ही मैफिल संगीतप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे. संगीत रसिकांनी या सुरेल मैफलीला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक "सुरश्री संगीत ग्रुप सावंतवाडी" यांच्या वतीने मंजिरी सचिन धोपेश्वरकर यांनी केले आहे.










