गोविळ मधील जमीन विक्रीचा मुद्दा तापला

परप्रांतीयांना जमीन विक्रीला विरोध
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 17, 2026 13:08 PM
views 54  views

लांजा : कोकणातील गोविळ गावामधील जमिनी परप्रांतीयांना विक्री बाबत नियंत्रण ठेऊन ग्रामपंचायतीत ( ग्रामसभेत ) ठरावं मंजूर करण्याबाबत गोविळ गुरववाडी मुंबई मंडळातर्फे माननीय सरपंच  संतोष गुरव ह्यांना निवेदन देण्यात आले.

आमच्या कोकणातील जमिनी ही आमची मालमत्ता नसून ती आमची ओळख, संस्कृती, परंपरा आणि अस्तित्वाचे प्रतीक आहे, गेल्या काही वर्षात कोकणातील जमिनी मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकांकडे विकल्या जात असल्याचे दिसून येत आहे ही बाब स्थानिक समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे.

आज जर आपण या कडे दुर्लक्ष केले तर, भविष्यात स्थानिक नागरिकांनाच  आपल्या भूमीत पर्केपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे, जमीन ही आपली आर्थिक साधन नसून पुढील पिढ्यानसाठी ची सुरक्षितता, आपल्या गावाची ओळख आणि स्थानिकांच्या हक्काचे संरक्षण आहे. 

आमचा कोणताही व्यक्ती किंवा समजविरोधात हेतू नसून, स्थानिक भूमिपुत्राचे हक्क, कोकणची संस्कृती,पर्यावरण आणि सामाजिक समतोल टिकून ठेवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.त्या मुळे आपल्या ग्रामपंचायतीने या विषयाची गाभीर्याने दखल घेऊन ग्रामसभेत चर्चा करावी आणि आपल्या कोकणातील गावातील जमिनी परप्रांतीयांना विक्री करण्यास नियंत्रण राहील अशा स्वरूपाचा ठरावं एक मताने मंजूर करावा ही नम्र विनंती.

तसेच गावच्या हद्दीतील जमिनी विक्रीच्या बाबतीत स्थानिक नागरिकांना प्राधान्य, ग्रामपंचायतिची माहिती आणि लोकसहमती या सारख्या बाबींचाही विचार करण्यात यावा अशी ही विनंती आहे.

आपण या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन गाव, समाज आणि भविष्यातील पिढ्यांच्या हिताचे रक्षण कराल अशी अपेक्षा आहे.