सिताराम लांबर सिंधुदुर्ग प्राथ. शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2026 12:12 PM
views 21  views

सावंतवाडी : धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई शाखा सावंतवाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा विद्यमान तालुका कार्यकारिणी सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक सिताराम लांबर  यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई शाखा सावंतवाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


धनगर समाजाला हा बहुमान प्रथमच मिळत असल्याचा समाजाला याचा सार्थ अभिमान असल्याचे मत समाज बांधवांनी व्यक्त केले. धनगर समाजातील समस्या सोडविण्यासाठी, सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करणारे, तेवढेच आपल्या शिक्षकी पेक्षात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन सेवाव्रत जपणारे,शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणारे, पालक, ग्रामस्थ, शिक्षक, समाज बांधव यांना आपुलकीने सोबत घेऊन कार्यरत रहणारे लांबर सर 

यांच्या नेतृत्वाखाली पतपेढीची अधिक प्रगती होवो व सर्व शिक्षक बांधवांना त्यांच्या  कार्याचा लाभ मिळो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आली. तसेच अध्यक्ष पदाची संधी उपलब्ध करून देणारे संचालक मंडळ, शिक्षक संघटना पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्ग यांना धन्यवाद देण्यात आले. याप्रसंगी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळाचे सावंतवाडी शाखा सचिव श्री विलास जंगले ,लक्ष्मण पाटील, विठ्ठल कुंभार, शेखर डोईफोडे, विजय रामचंद्र जंगले, जनार्दन लांबर, मंगेश वरक, परशुराम लांबर, विजय जंगले, नंदू खरात आदी पदाधिकारी व समजबांधव उपस्थित होते.