...अन्यथा ठिय्या आंदोलन ; भाजपचा इशारा

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 11, 2023 16:40 PM
views 114  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्यावर अनाधिकारपने एसटी महामंडळाची शयनयान बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा तसे न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिला आहे.

शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी प्रवाशांनी भरलेली शयनयान बस चालवली होती . असा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला असून आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी काल मंगळवारी भाजप शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस स्थानकात केली होती. यावर तपासी अंमलदार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक व्ही व्ही सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर तपासी अंमलदार यांचा पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याकडून देण्यात आली. मात्र आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आज संध्याकाळी ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष   संजय वेंगुर्लेकर यांनी आज कुडाळ पोलीस स्थानकासमोर माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्प्या तवटे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर राकेश नेमळेकर, तसेच श्री सुकळवाडकर उपस्थित होते.