मंदिराची दान पेटी फोडताना चोरट्याला पकडले

दान पेटीसह पान टपऱ्यांवर देखील चोरट्याचा डल्ला
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 02, 2022 11:14 AM
views 1082  views

कणकवली : कणकवली शहरात बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिरमधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. 

बुधवारी सकाळी ही घटना घडली. कणकवलीतील बालगोपाळ हनुमान मंदिराची दान पेटी फोडत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, अनिल अणावकर यांच्यासह तेथील काहींनी या चोरट्याला पाहिले व त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात अजून दान पेट्या फोडलेली रक्कम व पान पट्ट्यांमधील गुटखा, पान मसाला अशा वस्तू देखील आढळून आल्या.

 याबाबत चोरट्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता नागवे रोडवरील राम मंदिरमधली दानपेटी चोरट्याने फोडल्याचे सांगितले. या चोट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या चोरट्यासोबत अजून एक तरुण होता. मात्र नागरिकांची चाहूल ओळखून त्याने पलायन केले. पोलिसांकडून आता या चरोट्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती.