ठाकरे गट छेडणार 12ऑक्टोबरला धरणे आंदोलन !

देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नांबाबत वेधणार लक्ष
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 11, 2023 11:35 AM
views 454  views

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्या व प्रश्नांबद्दल तसेच येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची होणारी हेळसांड शासनाच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा देवगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय विटकर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स यांच्या रिक्त पदांमुळे  रुग्णांची होणारी हेळसांडबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही रिक्त पदे भरली जात नाहीत,जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आश्वासने देऊन अद्याप मागणी पूर्ण झालेली नाही.अशी असणारी रिक्तपदे दिनांक १२ऑक्टोबर २०२३ पर्यंत भरणा न झाल्यास रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता ३० वाजता देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर उबाठा शिवसेना गटाच्या वतीने धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन पक्षाच्या वतीने शांततेत लोकशाही मार्गाने केले जाणार आहे. तथापि यावेळी काही समाजकंटकांकडून या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याची शक्यता वाढली आहे. असे कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास अशा प्रसंगांची सर्वस्वी जबाबदारी आपली आपल्या प्रशासनाची राहील अशा इशाराही या निवेदना देण्यात आला आहे.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक, सतीश सावंत, कन्हैया पारकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम , जयेश नर महिला संघटक हर्षा ठाकूर युवसेना तालुका प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, सुधीर तांबे, विकास कोयडे, गणेश वाळके, संतोष दळवी अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निमित्ताने देवगड पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन दाभोळे येथील नापत्ता युवती बाबत तिच्या नातेवाईकांसमवेत त्या घटनेबाबत व अन्य बाबीची विचारणा केली तसेच देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उबाठा शिवसेना व भाजप कार्यकर्ते हे आमने सामने आले असता पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेत शिवसेना पदाधिकारी यांच्यावर अन्याय केला.या बाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडीत देवगड पोलीस प्रशासनाचा कारभार समोर आणणार आहोत.व येत्या अधिवेशनात ही घटना उपस्थित करण्यात येणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.