
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथे देवगडहून वाडातरच्या दिशेने जात असताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटून जामसंडे वाडातर येथे टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर वृत्त अस की जामसंडे वाडातर येथे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटून चार चाकी टेम्पो पलटी झाला. आतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून टेम्पोचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत मदत कार्य केले असून काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. सदरची घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.