कर्मचारी संपात शिक्षक समिती सहभागी होणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 23, 2024 11:15 AM
views 319  views

सिंधुदुर्गनगरी : २९ ऑगस्ट पासून होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग सक्रीय सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या २९ ऑगस्ट २०२४ पासूनच्या जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपात समन्वय समितीची घटक संघटना असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही सक्रियपणे संपात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा संप यशस्वी करण्याची तयारी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून शिक्षकांनी बहुसंख्येने या संपात सहभागी होऊन कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी केले आहे.