कणकवली : भीषण अपघाताची बातमी. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर फोंडाघाटात पलटी झाला. पलटी झालेल्या या टँकरने पेट घेतला.
ही घटना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट घेतला. त्यामुळे सायंकाळी साडे सहा पासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.