
कुडाळ : सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बीडवलकर याचे खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. नमुद गुन्हयात सिद्धेश शिरसाट यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवू देणार नाही याकरीता वकील किशोर सिदु वरक रा. खानोली, ता. वेंगुर्ला याने सिद्धेश शिरसाट याची पत्नी सिद्धी सिद्धेश शिरसाट यांचेकडे त्याचा साथीदार सुरेश दुर्गा झोरे, रा. गिरगांव, ता. कुडाळ यांच्यामार्फत दहा लाख रुपये खंडणीची मागणी करुन एक लाख रुपये सिद्धेश शिरसाट याचे मित्र योगेश ऊर्फ बंटी तुळसकर व हार्दीक शिगले यांचेकडून कुडाळ एमआयडीसी परीसरात दि. 03 जुलै 2025 रोजी घेतले. त्याबाबत सिद्धी शिरसाट यांनी दिले तक्रारीवरुन वकील किशोर सिदू वरक व सुरेश दुर्गा ओरे यांचेवर कुडाळ पोलीस ठाण्यात दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयात कुडाळ पोलीसांनी आरोपी सुरेश दुर्गा झोरे यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलेले होते.
गुन्हयातील आरोपी वकील किशोर सिदू वरक हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी होता. मुदतीत त्यानं मा. जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरीता अर्ज केलेला होता. नमूद अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला होता. त्यानंतर त्याने मा. जिल्हा व सत्र न्यायालयाचं निर्णयाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, कोल्हापूर यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता. नमुद अर्जाची मा. उच्च न्यायालयात दि. 07.01.2026 रोजी सुनावनी झाली. मा. न्यायालयाने वकील आरोपी किशोर सिदू वरक, सुरेश दुर्गा झोरे, व साक्षीदार योगेश तुळसकर यांचे खंडणीची रक्कम स्विकारलं त्या दिवशीचे तिघांचे मोवाईल टॉवर लोकेशन, आरोपी किशोर वरक याची गुन्हेगारी पार्श्वभुमी (दाखल असलेले 04 गुन्हे), सह आरोपी सुरेश झोरे याने वकील किशोर वरक याचे सांगणेवरुन फिर्यादी व साक्षीदार यांचेशी खंडणीचे पैशाची मागणी केलेले संभाषण, व गुन्हयाचे तपासकामाचे कागदपत्राचे मा. उच्च न्यायालयाने अवलोकन व निरीक्षण करुन आरोपीचं वकील आसिम सरोदे व सरकारी अभियोक्ता श्रीराम चौधरी यांचा युक्तीवाद ऐकून आरोपी वकील किशोर सिदू वरक याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर यांनी केलेली आहे.










