
सावंतवाडी : बांदा गवळीटेंब येथील दिपक बांदेकर यांच्या घरासमोरील रस्ता व निमजगा वाडीतील संजय सावंत यांच्या घराजवळील पाणंद रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आज जेष्ठ नागरीक हनुमंत सावंत व सविता बांदेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या दोन्ही रस्त्यांसाठी ग्रामस्थांची अनेक वर्षे मागणी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. दोन्ही रस्ते वस्तीतील असल्याने लोकांना देखील येण्या-जाण्याकरता त्रास होत होता. या रस्त्यांकरिता ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, बांदा ग्रामसेवक आदम शहा, सरपंच प्रियांका नाईक, शहराध्यक्ष बाबा काणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, माजी सरपंच अशोक सावंत, हनुमंत उर्फ मंथाकाका सावंत, संजय सावंत, गुरुनाथ सावंत, महादेव सावंत, गणेश बांदेकर, दीपक बांदेकर, भारत बांदेकर, सिताराम बांदेकर,तेजस बांदेकर, गौरी सावंत, सुप्रिया सावंत,पुष्पावती सावंत, भारती सुभेदार, संजना सावंत, सिया गवस, मनीषा सावंत, प्रसाद सावंत, शंभुराव देसाई,सविता बांदेकर, साक्षी बांदेकर, श्रद्धा बांदेकर, अंकिता बांदेकर, नीलम बांदेकर,संज्योत बांदेकर, संगिता बांदेकर, संचिता धुरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून लोकप्रतिनिधींचे आभार मानले.










