सिंधुदुर्गातील सर्वात उंच राष्ट्रध्वज सावंतवाडीत उभारणार

संदीप गावडे यांचा वाढदिनी संकल्प
Edited by: विनायक गांवस
Published on: July 31, 2025 20:53 PM
views 351  views

सावंतवाडी : भारत देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती जनतेची भावना सदोदित प्रज्वलित राहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज सावंतवाडी तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी आज येथे दिली आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा त्यांनी हा आगळावेगळा संकल्प सोडला असून लवकरच आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून राष्ट्रध्वज सन्मानाने उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री गावडे बोलत होते त्यांच्यासोबत सावंतवाडी शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, उल्हास गावडे आदी उपस्थित होते. श्री गावडे म्हणाले भारतीय जनता पार्टीची देशही त्याला प्रेरित संघटना आहे. या संघटनेत काम करत असताना समाज उपयोगी कार्यक्रमासाठी संघटने कडून नेहमी प्रेरणा मिळते याच पेरणेतून दरवर्षी मी माझा वाढदिवस समाजपोयोगी कार्यक्रमाने साजरा करतो गतवर्षी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील 11 शाळा सोलर सिस्टिम च्या माध्यमातून जोडण्यात आल्या होत्या. यावर्षीही असाच संकल्प मी वाढदिवसाच्या निमित्ताने सोडला असून जनतेची राष्ट्रप्रेमा कोटी असलेली भावना सदोदित प्रज्वलित राहील या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असे दोन राष्ट्रध्वज उभारण्याचा मानस आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात असे हे दोन राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरातील काही जागा निवडण्यात येणार आहे त्यासंदर्भात पालिकेकडे ही मागणी करण्यात येणार आहे सावंतवाडी शहरातील भाजपाची टीम यासंदर्भात चर्चा करून त्या जागा निश्चित करणार आहे तर ग्रामीण भागामध्ये चौकुळ या गावी योग्य जागा निवडून तेथे राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे तेथील ज्येष्ठ नागरिक गावातील प्रमुख मानकरी भाजपाचे कार्यकर्ते या संदर्भात चर्चा करून योग्य ती जागा निवडणार आहेत त्यानंतर या संदर्भात आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा राष्ट्रध्वज सन्मानाने उभारण्यात येणार आहे.

श्री गावडे पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरात मध्ये सैनिकी परंपरा आहे तसेच चौकुळ गावामध्येही सैनिकी परंपरा असल्याने या दोन ठिकाणी हे राष्ट्रध्वज उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात उंच असे हे राष्ट्रध्वज असणार आहे यामुळे येथील पर्यटनातही भर पडणार असून लवकरात लवकर हे ध्वज उभारण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.