
वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महीलेच्या खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीला वैभववाडी पोलीस आज न्यायालयात हजर करणार आहेत.पोलीस निरीक्षक फुलचंद मेघाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक काम करीत आहेत. संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्र्वभूमी आहे.