असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी - बारावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद : प्रमोद लोके

Edited by:
Published on: June 08, 2023 20:08 PM
views 92  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलदे हा गाव नेहमीच विविध क्षेत्राच अग्रस्थानी आहे. आत्ताच दहावी व बारावी परिक्षांचा निकाल जाहिर झाला त्यात आपल्या गावातील अनेक विद्यार्थ्यानी चांगले शैक्षणित यश संपादन केले आहे. असलदे गावची कु. भक्ती दयानंद हडकर हिने दहावी बोर्ड परिक्षेत ९१ टक्के मिळवत कासार्डे केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे , हा गावाचा अभिमान आहे. आत्ताचे विद्यार्थी उद्याचे गाव विकासित करणारे भविष्यातील पिढी आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी गावाच्या वतीने या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत . या विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात आवडीचे करीअर करण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधावी. असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत  मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोळोशी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके यांनी केले.

असलदे ग्रामपंचायत येथील रामेश्वर सभागृहात असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता , यावेळी व्यासपिठावर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर , माजी चेअरमन प्रकाश परब , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे , कृषी तज्ञ प्राध्यापक प्रसाद ओगले , आत्मा व्यवस्थापक विनायक पाटील , माजी सरपंच लक्ष्मण लोके , माजी व्हाईस चेअरमन प्रदिप हरमलकर , ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे , विद्या आचरेकर , विद्या डामरे , सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात ,  कृषी सहाय्यक श्री. बुदवळे , कृषी पर्यवेक्षक हुसेन आंबार्डेकर , ग्रामसेवक आर. डी. सावंत , संजय तांबे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , विठ्ठल खरात , अनंत तांबे , परशुराम परब , सचिव अजय गोसावी , रघुनाथ लोके , संजय डगरे , महेश लोके , मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर ,विनायक दळवी , सुरेश मेस्त्री , दिपक तांबे , विजय नरे , दया लोके , प्रकाश डामरे , अनिल लोके , ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सायली दळवी, सत्यवान घाडी,विजय डामरे, ठकोजी डामरे,योगेश डामरे आदींसह आरोग्य कर्मचारी , ग्रामस्थ , पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले , विकास सोसायटी आणि असलदे ग्रामपंचात यांच्या संयुक्त विद्यामाने हा गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे. आपल्या गावातील चांगले गुण मिळवून उत्तीण झालेले विद्यार्थी ही लाल मातीतील रत्ने आहेत. भविष्यात चांगले करीयर करीत असताना सोसायटीच्या माध्यमातून लागणारी मदत या विद्यार्थ्यांना केली जाईल. या विद्यार्थांनी मिळवलेल्या यशात हुरहुरुन न जाता यशाचे सातत्य टिकवले पाहिजे.  

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले , गावातील दहावी,बारावी तील विद्यार्थांना सत्कार करण्यात आला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलेली आहे, या विद्यार्थांनी पुढील काळात गावाचे नाव लौकीक करावे . या कार्यक्रमात कासार्डे केंद्रात दहावी च्या परिक्षेत प्रथम आलेली कु. भक्ती दयानंद हडकर हिला शाल , सुपारी वृक्ष भेटवस्तु देऊन सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते तर इतर विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. तसेच ग्रामसेवक राजेंद्र सावंत यांची ७ वर्षानंतर बदली झाल्यानंतर गावाच्या वतीने सत्कार चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल , सुपारी वृक्ष , भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. कार्यंक्रमाचा सुत्रसंचालन पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी केली.