जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला हे दाखवून द्यायचं : रवींद्र चव्हाण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 09:07 AM
views 166  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचं भाषण // ही लढाई उजव्या व डाव्या विचारसरणीची आहे // उजवी विचारसरणी हिंदुत्व,सर्वांचं हीत जोपासते // त्यामुळे या विचारसरणीच सरकार आणायचे आहे // कार्यकर्त्यांने ही निवडणूक डोक्यावर घ्यावी // प्रत्येक बुथवर ७० टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला मिळायला हवं असं काम करा // ही निवडणूक राज्याचं भवितव्य ठरवणार आहे // केंद्रात व राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार आलं पाहिजे // त्यासाठी कामाला लागले पाहिजे // आपल्या नेत्यांनी जो आदेश दिला तो पाळा // महायुतीच्या उमेदवारालाच विजयी करायचं आहे // हा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला हे दाखवून द्यायच आहे // लोकसभेत ज्या पद्धतीने ते काम केले तसेच काम करून हा जिल्हा अभेद्य ठेवा // घरोघरी जाऊन आपलं सरकार का यावं हे पटवून द्या // जे काल पर्यंत आपल्या सोबत होते तेच आज विरोधात जाऊन लढत आहेत // त्यांना योग्य ती जागा दाखवण्याची ही वेळ आहे //