सावंतवाडी शहराचा कौल चिंताजनक !

महायुतीच्या नेत्यांना धक्का !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 05, 2024 06:31 AM
views 2010  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठ्या मताधिक्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांना ३१ हजारांच मताधिक्य मिळाल. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मेहनत फळाली आली. परंतू, होमग्राउंड सावंतवाडी शहरात मात्र महायुतीला धडकी भरवणारा निकाल पहायला मिळाला. 


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच होमपीच असलेलं सावंतवाडी शहर. विद्यमान नगराध्यक्ष संजू परब भाजपचे या ठिकाणी आहेत. जोडीला माजी आमदार राजन तेली असं असताना सावंतवाडी शहरातून चार अंकी मताधिक्य सुद्धा महायुतीला गाठता आल नाही. नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंना 5394 मत पडली. तर विनायक राऊत यांना 5206 मत प्राप्त झाली. केवळ 188 मतांचं मताधिक्य महायुतीला इथून मिळाल. 17 पैकी 17 नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे असताना मिळालेलं मताधिक्य ही महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मुस्लिम मतदार, दलित मतदार आदींचा फटका बसल्याच महायुतीच्या गोटात बोलल जात आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चिंतन करायला लावणारा सावंतवाडी शहराचा निकाल आहे.