पंतप्रधानांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे होणार अनावरण

हा मालवणसाठी अभिमानाचा क्षण : नारायण राणे
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 26, 2023 21:01 PM
views 489  views

मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी किल्ले राजकोट येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत हा मालवणसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमान आहे. मालवण वासियानी हा क्षण आनंद सोहळा म्हणून साजरा करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नौसेना दीन सोहळ्याच्या निमित्ताने आपण मलवणात येत असलेल्या पंतप्रधानांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शुभेच्छा देऊयात असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.