कोकणच्या आरोग्याची खुद्द विधानसभा अध्यक्षांनी घेतली जबाबदारी

अधिवेशनात न्याय देणार, शासनास सुचना करणार : अँड. राहुल नार्वेकर
Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 20:00 PM
views 97  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची दैना कोकणसादनं समोर आणल्यानंतर याची दखल कोकणचे सुपुत्र असणारे विधानसभा अध्यक्ष अँड. राहूल नार्वेकर यांनी घेतली आहे. येणाऱ्या अधिवेशनात आरोग्यदृष्ट्या गरज असलेल्या कोकणवासियांना न्याय मिळवून देईन असा शब्द अँड. नार्वेकर यांनी दिला आहे. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, आरोग्य यंत्रणा ही मुलभूत सुविधा आहे. कुठच्याही प्रगतीपथावर असणाऱ्या राज्य अथवा देशासाठी आरोग्य व्यवस्थेत कुठच्याही प्रकारची कमतरता ठेवणं हे अत्यंत खेदजनक आहे. येणाऱ्या काळात शासन अधिकच लक्ष इथं देईलच. मी देखील मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयात भेट दिली होती. सर्व डीन व सुप्रिटेंडट यांची बैठक घेऊन कमतरता असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. निश्चितपणे कोकणाच्या आरोग्याला असणारी गरज बघता मी स्वतः यात लक्ष घालून शासनाला आकर्षित करणार आहे‌. तशा सुचना शासनाला करणार आहे. तर येणाऱ्या अधिवेशनात कोकणवासियांना निश्चित न्याय मिळवून देईन असा शब्द विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी दिला. याप्रसंगी सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.