LIVE UPDATES

इंद्रधनू देवगड संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य उल्लेखनीय : संदीप साटम

इंद्रधनू नवरात्र उत्सव 2026 चे शानदार उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 12, 2026 18:28 PM
views 35  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : इंद्रधनू देवगड ही संस्था देवगडच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेच्या उपक्रमांना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांचे देवगडवर अधिक प्रेम आहे, हे त्यांच्या अनेक भाषणांमधून जनतेला उमगले आहे. सध्या राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून इंद्रधनू संस्थेने सामाजिक भान राखत या नवरात्र उत्सवात जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी येथे व्यक्त केले.

इंद्रधनू देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्याने देवगड शहरातील पाटणकर कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सव २०२६ चे उद्घाटन संदीप साटम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने रविवारी करण्यात आले. 

यावेळी व्यासपीठावर इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, न. पं. पाणी पुरवठा समिती सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपचे देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजयुमोचे शहराअध्यक्ष दयानंद पाटील, युवा उद्योजिका जान्हवी गोसावी, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, जागामालक श्री. पाटणकर, इंद्रधनू संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य आनंद रामाणे, मिलिंद मोर्ये, राजीव पडवळ, वैभव केळकर, यतीन कुळकर्णी, अमोल वंजारे, पप्रशांत पटेल, भावेश पटेल, स्टारलाईट सिनेमाचे व्यवस्थापक यश रानडे आदी उपस्थित होते. नवरात्र उत्सवातील रंगमंचाचे उद्घाटन देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर तसेच देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी तथा ज्येष्ठ सुवर्णकार नीलरत्न उर्फ बबन मालंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, आनंद रामाणे, मिलिंद मोर्ये यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाडेकर यांनी केले.

या नवरात्र उत्सवातील पहिल्या दिवसातील निवडक कलाकारांना आकर्षक भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात बेस्ट चाईल्ड (बॉय) राजवीर चांदोस्कर, बेस्ट चाईल्ड (गर्ल)- विधी तेलीराणे, लक्षवेधी चेहरा (पुरुष) सौम्य चौगुले, रुपेश मेस्त्री, लक्षवेधी चेहरा (स्त्री) हर्षदा सावंत, लीना चौगुले, बेस्ट स्माईल - रसिका देवगडकर, बेस्ट कॉस्च्युम सई खवळे, दांडिया नाईट किंग- निखिलेश जोशी, दांडिया नाईट क्विन- प्रीती पाटकर यांना सन्मानित करण्यात आले. नवरात्र उत्सवातील पहिल्याच दिवशी रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता दांडिया नाईट विथ सेलिब्रिटी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध गायक व भारत का अमृत कलश विजेता सिद्धेश जाधव, सुप्रसिद्ध गायिका व सूर नवा ध्यास नवा फेम तृप्ती कुडाळकर हे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभघ्यावा, असे आवाहन इंद्रधनू देवगड संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.