गुरूपौर्णिमेनिमित्त अर्पण केलं चांदीच सिंहासन !

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 15:07 PM
views 57  views

सावंतवाडी : गुरूपौर्णिमेनिमित्त कोल्हापूरचे २६ वे मठाधिपती परमपुज्य श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या ज्येष्ठ शिष्या प.पू. शोभाताई माऊली आणि त्यांच्या शिष्यांनी काडसिद्धेश्वर महाराजांच्या तसबिरीला चांदीच कलात्मक सिंहासन अर्पण केल. गुरूपौर्णिमेनिमित्त मोठा उत्साह यावेळी पहायला मिळाला.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी प्रत्येक शिष्य, गुरूंचे भक्त आपल्या परीनं वैयक्तिक किंवा सामुदायिकरित्या आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर केलेल्या प्रेमाबद्दल, दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि उपकाराबद्दल उतराई होण्यासाठी धडपडत असतात. ब्रम्हज्ञानी सद्गुरू २६ वे मठाधिपती कोल्हापूर श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या ज्येष्ठ शिष्या परम.पूज्य. शोभाताई माऊली आणि त्यांच्या शिष्यांनी मुंबईतील दादार मधील श्रीकृष्ण मंदीर हॉलमध्ये भव्य रोषणाई केलेल्या मंचावर काडसिद्धेश्वर महाराजांच्या तसबिरीला चांदीच कलात्मक सिंहासन अर्पण केल. चांदीच छत्र असणाऱ्या या चांदीच्या आसनावर सद्गुरूंची तसबीर स्थापन केली.

संपूर्ण सभागृह सद्गुरूंच्या नामघोषात दुमदुमून गेल. या क्षणाचा आनंद प.पू. शोभाताईंच्या चेहऱ्यावर दिसत होता. आरती, दासबोध वाचनानंतर परमपुज्य शोभाताई यांनी सद्गुरुंचे महत्व व त्यांनी दिलेल्या बोधावर मार्गदर्शन केले. आरती महाप्रसादानं सांगता झाली. यावेळी शेकडो भक्तगण उपस्थित होते.