
मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत असल्याचे वातावरण आहे. १९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद विभागात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय महायुती कडून सौ. सोनाली सुनील घाडीगांवकर ह्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी सभापती सुनील घाडीगांवकर व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून हा विभाग मागील ३५ वर्षांपासून खासदार नारायण राणे आणि आता आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी असून आजपर्यंत या विभागात झालेल्या प्रत्येक विकासकामात खा. नारायण राणे यांचाच सहभाग राहिला आहे. सौ. घाडीगावकर यांनी या विभागातून २०१२ ते २०१७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन यंदा त्या मैदानात उतरल्या असून विभागातील प्रत्येक गावागावात असणाऱ्या कार्यकर्त्यांचे भक्कम बळ घेऊन प्रचारात आपण आघाडी घेतल्याची भावना सौ. घाडीगांवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आडवली मालडी जिल्हा परिषद विभाग हा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगांवकर तसेच त्यांच्या सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विभागात १९९० पासून मजबूत संघटन बांधणी केली आहे. राणेसाहेबांनी १९९० पासून विभागातील सर्वच गावच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व गावे रस्त्यानी जोडली. राणे साहेबांच्या मार्गदर्शनात सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती अश्या विविध पदावर काम करत गावचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करणारे सुनील घाडीगांवकर हेच खऱ्या अर्थाने विकासाचे केंद्रबिंदू राहिले. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सुनील घाडीगांवकर यांनी विभागाच्या विकासात मोलाचे योगदान नेहमीच देण्याच्या प्रयत्न केला आहे. मागील दहा वर्षांच्या काळात मालवणात विरोधी पक्षाचे आमदार, खासदार असल्याने हा विभाग विकास कामांपासून वंचित राहिला होता. त्यामुळे काही ठिकाणचे अंतर्गत रस्ते खराब झाले असून ग्रामस्थांना किरकोळ स्वरूपाच्या समस्या भेडसावत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा राणे पर्व जिल्ह्यात आले आहे. खासदार राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून शिरवंडे गावाच्या आणि संपुर्ण आडवली मालडी जिल्हापरिषद मतदार संघाच्या नव्या विकासपर्वासाठी सौं. सोनाली सुनील घाडीगांवकर जिल्हापरिषद सदस्य म्हणून सज्ज होत आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सुनील घाडीगावकर यांची खंबीर साथ पत्नी सोनाली घाडीगावकर यांना मिळणार आहे. त्यांनी यापूर्वी पाच वर्षे जिल्हापरिषद सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून नव्या विकासपर्वा साठी आणि जनतेच्या सेवेसाठी सौं. सोनाली सुनील घाडीगावकर जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा विजयी होणार. असल्याचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.











