
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्यात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आणि नाटकासाठी प्रसिद्ध असलेल्या आचरेकर प्रतिष्ठानचे रूप आता पालटत आहे. कारण या ठिकाणी आता जिल्हा वासियांना उपयुक्त अशा सेवा सुविधा ड्रीम इव्हेंट्स मॅनेजमेंट ने उपलब्ध करून दिल्या आहेत.
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध असलेल्या ड्रीम इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुसज्ज अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलांना खेळणी, सेल्फी पॉइंट, रिव्हर व्ह्यू, पार्किंग ,स्वच्छतागृह व सर्वांनाच आकर्षक असे असणारे विद्युत डेकोरेशन ज्यामध्ये आपल्याला लग्न, रिसेप्शन, मुंज, साखरपुडा,पार्टी यासारखे मोठे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत असल्याने ड्रीम इव्हेंट्स मॅनेजमेंट च्या माध्यमातून आता आचरेकर प्रतिष्ठान विकसित होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आचरेकर प्रतिष्ठान कणकवलीकरांसाठी एका अनोख्या थाटात आणि रुबाबात असल्याचे दिसत आहे