सेना - भाजपातील वाद चव्हाट्यावर

मुख्यमंत्र्यांआधीच राजन तेलींनी मारली कुदळ
Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 05:24 AM
views 81  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन होणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील धरणाचे भूमिपूजन माजी आमदार राजन तेली यांनी केले. त्यावेळी माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, माजी जि. प.अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, उपसरपंच संतोष वेझारे, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, गाव प्रमुख आर. के. सावंत शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत उर्फ बाबू सावंत ग्रामपंचायत सदस्य गीता कासार, मधू कुंभार, माधवी भोगण , भाजप सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंधावळे,अजय सावंत,सचिन बिर्जे, ऍड सचिन गावडे, ऍड शामराव सावंत आदी मान्यवर व माजगाव गावातील शेकाडो ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात भाजपनं भुमिपूजनाचा नारळ आधीच फोडल्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिवसैनिक कोणती भुमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे