युवासेनेच्या 'निर्धार मताधिक्याचा...गावदौरा सुसंवादाचा' दुसरा टप्पा पूर्ण

वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे गावात गावादौरा बैठक संपन्न
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 10, 2024 13:17 PM
views 119  views

देवगड : युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या "निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा" या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून. कणकवली विधानसभा मतदार संघात 90 गावात यशस्वी बैठका संपन्न झाल्या. या गावदौऱ्याला जनतेतून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. हा गावदौऱ्यांची घोडचाल यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी तालुकाप्रमुख, तसेच गावातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यामुळे या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पार झाला.

गावागावातून युवासेनेने हाती घेतलेल्या गावादौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा मटधिक्य मिळवून देण्यासाठी युवासेना मैदानात उतरून धडाडीने कार्यरत आहे. खासदार राऊत यांनी केलेल्या विकासकामांची प्रचिती या गावदौऱ्यातून मिळत आहे. प्रत्येक गावात पोहचनारे एकमेव खासदार विनायक राऊत यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या झालेल्या सभेले युवासेनेने आयोजन केलेल्या गावदौऱ्याच्या माध्यमातून गावा - गावातून नागरिक उपस्थित होते.

वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे व चिंचवडी गावात गावादौऱ्याच्या बैठका संपन्न झाल्या. यावेळी नागरिकांशी गावा गावात बैठका घेतल्यामुळे प्रत्येकाच्या समस्या ही जाणून घेता आल्या व त्यावर उपाययोजना घेखील करण्यात येणार आहे. असे आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत सचिन सावंत, देवगड युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, बुवा तारी, संदीप गुरव, रमा राणे, महेश मोंडे, संतोष राणे, लवू पाखले, जगन्नाथ गुरव, चंद्रकांत पुजारे, प्रवीण चौघुले, संतोष, गौरी मोंडकर, गुरुनाथ मांडकर, बाळा अनभवणे, महेश अनभवणे आदी गावातील ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.