कलंबिस्त तावडे वस मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन शुक्रवार ९ मे रोजी

Edited by:
Published on: May 04, 2025 18:28 PM
views 53  views

सावंतवाडी : कलंबिस्त  येथील श्री देव तावडे वस मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा शुक्रवार ९ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापुजेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

तसेच यावेळी सकाळी ९ वाजता अभिषेक, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ७ वाजता भजन, रात्री ८ वाजता आनंद तावडे ग्रुप यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठीचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन तावडे परिवाराकडून करण्यात आलंय.