
सावंतवाडी : गेले दोन दिवस पुन्हा एकदा सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे नगरपरिषदे समोर सुरू असलेले आंदोलन सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. कंत्राटी सफाई कामगारांचा मागील दोन महिन्याचा पगार झाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते. सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी मुख्याधिकाऱ्यांशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व मनसेचे अँड अनिल केसरकर, अँड राजू कासकर यांनी वारंवार संपर्क साधून तसेच संबंधित ठेकेदाराशी रीतसर पाठपुरावा करीत या कंत्राटी कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन यशस्वीरीत्या मिळवून दिले.
सायंकाळी उशिरा कंत्राटी कामगारांच्या खात्यावर त्यांचे वेतन जमा झाले. त्यामुळे रोजच्या मजुरीवर काम करणाऱ्या या सफाई कामगारांनी राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी मनसेचे अनिल केसरकर ठाकरे शिवसेनेचे शब्बीर मणियार भाजपचे अजय गोंदावळे, शिवसेनेच्या अनारोजीन लोबो, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी दीपक म्हापसेकर यांचे विशेष आभार मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी सरचिटणीस हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी शहर चिटणीस राकेश नेवगी अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू मनसेचे राजू कासकर, आशिष सुभेदार सर्व कंत्राटी सफाई कामगार आदी उपस्थित होते.