नौकेवरून खलाशी समुद्रात पडला !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 06, 2024 13:40 PM
views 215  views

देवगड : देवगड कुणकेश्वर येथील गजानन प्रसार हा टॉलर वरील खलाशी कुणकेश्वर येथील समुद्रात पडला . हा प्रकार ४ जानेवारी ला सकाळी सहा वाजता घडला. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देवगड बंदरातील राहुल हर्णेकर यांच्या मालकीची गजानन प्रसार ही मच्छीमारी नौका दि. 3 जानेवारी ला सा. 3:30 वा. समुद्रात गेली असता ४ जानेवारी ला स. ६ वा. कुणकेश्वर समुद्रात मच्छीमारी करीत असताना नौकेवरील खलाशी धनेश बिफल राम (३७) रा .बंगूरकेला छत्तीसगड हा पडून अपघात घडला . त्याचा शोध घेऊन ही तो सापडला नाही त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार  त्याच नौकेवरील खलाशी सुरेंद्र फन्साई डोमरा राहणार झारखंड यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कॉ .सौ.एस .एस.सावंत याबाबतच्या पुढील तपास  करीत आहेत.