
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे, हिंदुत्त्वाच प्रतिक असणारे भगवे झेंडे शहरातील चौकाचौकात उभारण्यात आले होते. गेली अनेक वर्षे हे झेंडे चौकाचौकात डौलानं फडकत आहेत. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकातील हे भगवे झेंडे पुन्हा एकदा डौलानं फडकवण्यात आलेत. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, शंभू विर्नोडकर,मेहर पडते,अनिकेत पाटणकर,अर्चित पोकळे,गौतम माठेकर,पवन बिद्रे,देवेश पडते,राघवेंद्र चितारी,सूरज मठकर,शुभम बिद्रे आदी उपस्थित होते.