
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी नगरपरिषद सावंतवाडी 2025 निवडणूक प्रचार गाठीभेटी दौरा प्रभाग क्र.१ व प्रभाग ४ मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्यासाठी राजेसाहेब खेम सावंत भोसले व राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी प्रचारात सहभाग घेत नगरसेवक पदाच्या उमेदवारांना देखील आशीर्वाद दिला.
यावेळी प्रभाग १ चे उमेदवार राजू बेग , महिला नगरसेवक पदाचे उमेदवार दीपाली भालेकर व प्रभाग क्र ४ चे उमेदवार गोपाल नाईक व मेहशर शेख यांच्या प्रचार केला. यावेळी बाहेरचावाडा, भटवाडी, झीरंगवाडा, येथील कार्यकर्ते पदाधिकारी, बुथप्रमुख, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, जिल्हा उपाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सौ. मिसबा शेख, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, विराग मडकाईकर यांनी केंद्र व राज्यसरकारच्या अल्पसंख्यांक समुदयास आर्थिक, सामाजिक मजबूत करण्याच्या योजना माहिती दिली. सोबत सावंतवाडी सुजलाम सुफलाम करण्यासाठीचे विचार, ग्लोबल सावंतवाडी बनवण्याचे व्हीजन, महिला सक्षमीकरण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सोयी सुविधा त्या विषयी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी पटवून दिले. सोबत प्रचारात सहभागी महिलाचे आभार मानले.










