श्रमदानातून केला नाटळ धाकटे मोहुळचा रस्ता..!

Edited by:
Published on: October 08, 2023 18:47 PM
views 125  views

कणकवली : नाटळ येथील धाकटे मोहुळ मध्ये रस्ता खचलेल्या अवस्थेत असल्यामुळे एस टी सेवा गेली 3 महिने बंद होती. ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तसेच सरपंच यांच्याकडे रस्ता दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला परंतु ग्रामपंचायतीने याकडे पूर्णता दुर्लक्ष केले. हा रस्ता खचलेला असल्यामुळे धाकटे मूळ येथील कॉलेज व शाळेतील मुलांना तीन किलोमीटर चालत येऊन रामेश्वर मंदिर येथे एसटी पकडावी लागत होती.

तीन महिन्यात प्रशासनाने कुठलीच हालचाल केली नाही म्हणून सदर बाब लक्षात येता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाटळ विभागीय नेते प्रदीप  सावंत यांच्या नेतृत्वाखाली असंख्य ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी सदर मार्ग श्रमदानातून व्यवस्थित केला. त्यामुळे एसटी बस सेवा ही धाकटे मोहुळ येथे जाऊ शकते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री रमाकांत घाडीगावकर, सचिन सावंत, नागेश बोडेकर, अनिल सावंत, गणेश सावंत, अभिशन सावंत ,पद्माकर पांगम , संजय सावंत, नलेश परब,गजा पाटकर आदी उपस्थित होते.