शिवसंस्कारच्या भव्य आंतरराज्यीय स्पर्धाचा निकाल जाहीर

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 20:04 PM
views 123  views

सावंतवाडी : किल्ले रायगडवर ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या राज्याभिषेकाने महाराज सार्वभौम राजे बनले. या दैदिप्यमान सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त यंदाचे वर्ष हे श्रीशिवराज्याभिषेक शक म्हणून राज्यमेरात साजरे केले जात आहे. त्याप्रित्यर्थ शिवसंस्कारतर्फे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजराथ या चारही राज्यांत भव्य आंतरराज्यीय रांगोळी, निबंध व समूहगीत गायन इ. स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात रांगोळी स्पर्धा- खुला गट- विषय - छत्रपती शिवाजी महाराज, शिवराज्याभिषे प्रथम सौ. सोनिया रमेश खुणे, पुणे. द्वितिय क्रमांक राम सूर्यकांत बिववणेकर, तृतीय क्रमांक अजित तुकाराम बिले, कोल्हापुर. यांनी तर लहान गट प्रथम क्रमांक- कु. पियुषा उमाजी राणे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक - कु. रेश्मा शिरोडकर मळगांव, सिंधुदुर्ग - तृतीय क्रमांक - कु. केतकी धोंडू सावंत, मळगांव, सिंधुदुर्ग. उत्तेजनार्थ स्वराज गजानन पाटील, फोंडा, गोवा. यांनी प्राप्त केला आहे. 

निबंध स्पर्धा खुला गट शिवराज्याभिषेक सोहळप्रथम क्रमांक अनिकेत लक्ष्मण सावंत बांदा, सिंधुदुर्ग, द्वितिय क्रमांक - सौ. चैताली चेतन बिडये. कणकवली, सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक श्री. सौरभ सुनील जोशी उदयपुर, राजस्थान यांनी तर समूहगीत गायन स्पर्धा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या एकाच गीतासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चराठे आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ चराठा, द्वितिय क्रमांक - खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा, तृतीय क्रमांक - चि. स्वराज आणि साथीदार उसगांव तिस्बु, गोवा, बेळगांव यांनी प्राप्त केला.

सर्व विजेत्यांचं सर्वत्र अभिनंदन होत असून रांगोळी स्पर्धा फक्त खुल्या गटासाठी असताना सुद्धा लहान गटातील मुलांनी अतिशय उत्साही सहभाग नोंदवला त्याबद्दल संस्थेचना डॉ. सोनल लेले, श्री. गणेश ठाकुर, प्रा. सुभाष गोवेकर, अँड. सोनू गवस, प्रारुपेश पाटील, श्री संदेश देसाई व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच बेळगांव येथील ३ वर्षे वयाच्या कु - शिवन्या भोसले पाटील व ४ वर्षे वयाच्या वयाच्या चि.विराज पाटील यांनी पारंपारिक वेशभूषेत समूहगीत गाऊन सर्वांना आकर्षित करून घेतले.विजेत्या सर्वांना 'शिवसंस्कारच्या भव वार्षिक सन्मान सोहळ्या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. संस्थेने सहभागी सर्व स्पर्धकांचे आभार मानले.