जलजीवन मिशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचा निकाल जाहिर..!

Edited by:
Published on: February 15, 2024 09:04 AM
views 72  views

सिंधुदुर्गनगरी :  जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला, वक्तृत्व व लघुचित्रपट स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. विजेत्या स्पर्धकांना दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मा. पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 

जल जीवन मिशन अंतर्गत प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता प्राथमिक व माध्यमिक गटात निबंध व चित्रकला तर ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालय गटात वक्तृत्व स्पर्धा तर खुल्या गटात लघुचित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. तर लघुचित्रपट स्पर्धेचे परिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत समितीच्या माध्यमातुन करण्यात आले आहे. 

जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे कु. सुयश सदगुरु साटेलकर, न्यु इग्लिश स्कुल आचरा, कु. खुशी हनुमंत नाईक, जि.प. शाळा पडतेवाडी कुडाळ, कु. नव्या संतोष राऊळ, जि.प. शाळा शिरशिगे सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर माध्यमिक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे कु.पर्णिका हनुमंत नाईक, कुडाळ हायस्कुल कुडाळ, कु.राज्ञी विवेक कुलकर्णी, शेठ म. ग. हायस्कुल देवगड, कु.मैथिली सुनिल सावंत, श्री. भाईसाहेब  सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव, सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे कु. तेजस्वी आनंद मैस्त्री, जि. प. शाळा मसुरे देऊळवाडा, मालवण, कु. मोहित निळकंठ सुतार, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कु.ओम किशोर चव्हाण, सरबंळ इंग्लिश स्कुल, कुडाळ  यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर माध्यमिक गटात कु.निशात प्रसाद राणे, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कु.प्राजली विश्वास कदम, शिरगाव हायस्कुल, देवगड, कु.निधी दिलिप कदम, चिद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे कु. सौम्या संदेश मणेरकर, सरस्वती विद्यालय कुडासे, दोडामार्ग, कु. श्रध्दा सत्यवान मडव, शिवाजी इग्लिश स्कुल, जाभवडे कुडाळ, कु. श्रध्दा लक्ष्मण नेमण, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. तर सिनिअर गटात कु. शेफाली नारायण कशाळीकर, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, कु. श्रावणी संजय गावडे, स.का. पाटिल महाविद्यालय मालवण, कु. रिध्दी बाळकृष्ण कदम, श्री. स.ह. केळकर महाविद्याल देवगड यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

जिल्हास्तरीय खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे विनोद दळवी, संतोष बादेकर, अनिकेत मिठबावकर यांनी क्रमांक प्राप्त केला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय अनुक्रमे रक्कम रुपये 31000/-, 21000/-,11000/- सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 

जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित स्पर्धाचा बक्षिस वितरण कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ईच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालय, ओरोस मुबंई- गोवा हायवे नजिक आयोजित कारण्यात आला आहे. या कार्यक्रमांत मा. पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहवे असे आवाहन त्यानी यावेळी केले आहे.