
सावंतवाडी : मिलाग्रीस महाविद्यालय, सावंतवाडीचा १२ वीचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. कॉमर्स अँड सायन्स विभागातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत विज्ञान शाखेत स्वरा दळवी ८३.१७ टक्के प्रथम, द्वितीय आयडोनिया परेरा ८०.१७ टक्के तर सेबास्टियन सालदान्हा ७७.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कॉमर्स विभागात सना चोडणेकर ९१.६७ टक्के प्रथम, रोशनी सावंत ८८.१७ टक्के द्वितीय, डेन्झिल डिसोझा ८३.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य व शाळा प्रशासनाकडुन अभिनंदन करण्यात आले.