मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 27, 2024 08:15 AM
views 129  views

मालवण : इयत्ता दहावीचा मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के एवढा लागला आहे. मालवण तालुक्यात ९९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४४९ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत १२३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.