कणकवली तालुक्याचा निकाल ९९.६ टक्के..!

निधी सावंतला १००% गुण
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 27, 2024 14:26 PM
views 120  views

कणकवली : कणकवली तालुक्याचा निकाल ९९.६% लागला असून सेंट उर्सुला ची विद्यार्थिनी निधी प्रकाश सावंत हिला १०० शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय गायत्री विजयकुमार राठोड याला  ९९.२० टक्‍के गुण मिळाले आहेत. तृतीय क्रमांक न्यू इंग्‍लिश स्कूल फोंडाघाट मानसी राजन नानचे ९८.६० टक्‍के व चतुर्थ क्रमांक चिन्मयी राजन चिके ९८.२० आणि एस.एम.कणकवली ची पूर्वा माधव प्रभुदेसाई ९७.८० टक्‍के तर अदिती दामोदर खानोलकर ९७.८० टक्के विभागून सेंट उर्सुला दोघांनाही समान गुण.

तालुक्यातील सर्वच माध्यमिक विद्यालयातील मुलांनी घवघवीत यश मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.