कुडाळ न.पं.च्या पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर !

तुषार आजगावकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 09, 2023 12:22 PM
views 210  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार विनायक आजगावकर, द्वितीय क्रमांक रामा मारुती गवळी, तृतीय क्रमांक केतन मालजी पवार यांनी पटकावले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण कलादिग्दर्शक महेश कुडाळकर यांनी केले होते.

कुडाळ नगरपंचायतीच्यावतीने पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शहरातून २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी दिल्यानंतर तो जाहीर करण्यात आला. यामध्ये उत्तेजनार्थ प्रथम विघ्नेश दाभोलकर, द्वितीय शैलजा कांबळी, उत्कृष्ट माती सजावट प्रथम विलास उमळकर, द्वितीय केतन पवार, सुबक मूर्ती प्रथम मिलिंद परब, द्वितीय साहिल राऊळ, उत्कृष्ट नैवेद्य पान प्रथम अरविंद मेस्त्री, द्वितीय तुषार आजगावकर यांनी क्रमांक पटकावले. आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकसाठी ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये हि पारितोषिके कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली होती. तर प्रथम क्रमांक चषक उपनगराध्यक्ष किरण शिंदे, द्वितीय क्रमांक नगरसेविका श्रेया गवंडे, तृतीय क्रमांक नगरसेविका श्रुती वर्दम, उत्तेजनार्थ क्रमांकासाठी प्रथम ३ हजार १११ रूपये नगराध्यक्ष अक्षता खटावकर, चषक नगरसेविका चांदणी कांबळी, द्वितीय ३ हजार १११ रूपये नगरसेवक मंदार शिरसाट, चषक नगरसेविका सई काळप, उत्कृष्ट माटी सजावट प्रथम २ हजार १११ रूपये नगरसेवक उदय मांजरेकर, चषक नगरसेवक अभिषेक गावडे, द्वितीय १ हजार १११ रूपये नगरसेविका ज्योती दळवी, चषक नगरसेवक निलेश परब, सुबक मूर्ती प्रथम २ हजार १११ रूपये नगरसेविका आफरीन करोल, चषक नगरसेवक राजीव कुडाळकर, द्वितीय १ हजार १११ रूपये नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, चषक नगरसेविका नयना मांजरेकर, उत्कृष्ट नैवेद्य पान प्रथम २ हजार १११ रूपये नगरसेविका संध्या तेरसे, चषक नगरसेवक संतोष शिरसाट, द्वितीय क्रमांक १ हजार १११ रूपये नगरसेवक गणेश भोगटे, चषक स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर यांनी केलं. 

तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना वृक्ष भेट भाजपा गटनेता तथा नगरसेवक विलास कुडाळकर यांच्याकडून देण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच केले जाणार असल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले.