SSC RESULT 2023 ; दोडामार्ग तालुक्याचा निकाल ९८.६६ टक्के

Edited by: संदीप देसाई
Published on: June 02, 2023 16:01 PM
views 175  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.३६ टक्के इतका लागला आहे. यात १५ पैकी १२ प्रशालांचा १०० टक्के इतका निकाल लागला असून घोडगेवाडी येथील कीर्ती विद्यालयाने सलग १२ वर्षे १०० टक्के निकाल लावत १०० नंबरी यशाचा एक तप पूर्ण केला आहे.

तालुक्यातून एकूण३६७ विद्यार्थी परीक्षेस सहभागी झाले होते. पैकी ३६६ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली यात ३६० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के इतका लागला. १४७ विद्यार्थी विशेष श्रेणीत तर १५४ जण पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.