
देवगड : इयत्ता दहावीचा देवगड तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के एवढा लागला असून शेठ म.ग. हायस्कूल, देवगड. ची शिवानी प्रशांत मेस्त्री 97.60 तालुक्यातून प्रथम आली आहे. तर सलोनी संजय मेस्त्री 96.60 द्वितीय आली आहे. मुनगे हायस्कूलचा विवेक परब ९५.४०% तृतीय क्रमांक हा आला आहे.
देवगड तालुक्यात १४८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी १४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४०६ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ६५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ३४१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ६८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 24 शाळांचा निकाल १००%टक्के लागला आहे.