
कुडाळ : कुडाळ सरंबळ येथील परबवाडीत एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना घडली होती. भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या पहाटेच्या सुमारास विहीरीत पडला. सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहीरीत सकाळी हा बिबट्या पडलेला दिसून आला. विहीरीत बिबट्या पडल्याची माहीती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, कुडाळ येथील वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोखंडी पिंजरा पाण्यात सोडून त्या बीबट्याला रेस्क्यू केले. दोन ते अडीच वर्षाचा हा बिबट्या असून त्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.