दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला..?

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 03, 2023 19:00 PM
views 506  views

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आचरा व कुडाळ तालुक्यातील हुमरमळा - अणाव, हुमरमळा - वालावल,वालावल,भडगाव बुद्रुक  व वर्दे या ग्रामपंचायती  ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या विधानसभा मतदारसंघातील असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे या ग्रामपंचायतींमध्ये वैभव नाईक यांना धोबी पछाड देण्यासाठी कंबर कसून आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील साटेली - भेडशी, बोडण, कुडासे खुर्द, तसेच वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर, मातोंड,खानोली,वायंगणी या ग्रामपंचायत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायती आहेत त्यामुळे तिथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपकडून आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार राजन तेली यांची सुधा प्रतिष्ठा पणाला लागली आहे, 

तर आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणेखुर्द तसेच देवगड तालुक्यातील वळीवंडे,शिरवली,रामेश्वर,पावणाई, फणसगाव,विठ्ठलादेवी, वानिवडे, तिर्लोट,ठाकूरवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे नितेश राणे  यांची ही प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. तर नितेश राणे यांना धोबीपछाड देण्यासाठी संदेश पारकर सतीश सावंत आमदार वैभव नाईक सुशांत नाईक यांनी कंबर कसली आहे.