
सावंतवाडी : नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदिरावर काल रात्री ९ च्या सुमारास आंब्याच झाड पडले. पत्र्याच्या शेडवर हे झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हनुमंताची घुमटीला सुरक्षित असून तिसऱ्यांदा असा प्रकार मंदिराच्या ठिकाणी घडला आहे.
सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. आंब्याच झाड कोसळून मंदिराच्या शेडचे मोठे नुकसान झाले. मारुतीरायाच्या कृपेने मंदिराला बाधा झाली अशी माहिती हनुमान भक्त, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी दिली. वीजवाहिन्यावर झाड पडल्यामुळे येथील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग व नगरपालिकेच्या मदतीने ते झाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामात अनेक भक्तगण सेवा भावानं सहभागी झाले आहेत.