कोकणाच्या लाल मातीतून उत्तम खेळाडू घडावेत : विशाल परब

Edited by:
Published on: April 06, 2024 05:40 AM
views 233  views

सावंतवाडी : श्री माऊली कला क्रीडा सेवा मंडळ दळवीवाडी - बांगडेवाडी, न्हावेली एक गाव एक संघ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी न्हावेली येथे उपस्थित राहून क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तरुण बांधवांना माझ्याकडून आशा आहेत त्याच उत्तर मी नक्कीच येत्या काळात काहीतरी आगळवेगळ करून देईल. मी बोलून न दाखवता ते करून दाखवेल. माझ्या मतदारसंघातील मुलांच्या हाताला काम देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, आणि ते पूर्णही करेल असं विशाल परब यांनी सांगितलं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच माझं स्वप्न आहे आणि ते मी उभारणार आहे. आयपीएल सारखे मोठे क्रिकेट सामने देश पातळीवर होत असताना त्याच तुलनेने राज्य पातळीवरील सामने सावंतवाडी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तुमच्या सर्वांची इच्छाशक्ती माझ्या सोबत असेल तर ते स्वप्न मी पूर्ण करू शकतो.

एखादा चांगला खेळाडू या कोकणाच्या लाल मातीतून घडावा आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जावर जावा, अशी माझी अपेक्षा आहे. झारखंड किंवा नक्षलवादी क्षेत्रातून एकदा उत्तम दर्जाचा खेळाडू घडतो तर माझ्या कोकणातून खेळाडू घडावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही उत्तम दर्जाचे खेळाडू घडवण्याची जबाबदारी घ्या मी तुमची जबाबदारी घेतो, असे त्यांना आश्वासित केले.

यावेळी  बंड्या दळवी, गजानन दळवी, प्रशांत दळवी, अंकित घोगळे, शंतनु शिंदे, एकनाथ दळवी, सुरेश दळवी, संदिप मोगम, प्रशांत मोगम, संदिप दळवी, संदिप सावंत, सतिश सावंत, विलास सावंत, बाबा गावडे, प्रमोद पारशेकर, सागर नाईक, निलेश दळवी, संजय दळवी, संजय केळुसकर, अंकुश मुळीक, सुनिल मोगम, प्रसाद गावडे, समीर पारशेकर, सुमन सावंत, प्रशांत मुळीक, विकास जेठे, हेमंत जेठे, अभिषेक जेठे, नंदकिशोर दळवी, शिवराम दळवी, यज्ञेश दळवी, महेश दळवी, रमाकांत दळवी, समीर दळवी, निखिल केळुसकर, हरीश केळुसकर, खेळाडू, प्रेक्षक, स्थानीक ग्रामस्थ उपस्थित होते.