सिंधुदुर्गात लोकसंख्या वाढीचा वेग मर्यादित : डॉ. सई धुरी

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 14, 2023 11:43 AM
views 193  views

सिंधुदुर्गनगरी :  जागतिक लोकसंख्या दिनाचा कार्यक्रम साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्या वाढीचा वेग मर्यादित आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला   व लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह असलेला हा जिल्हा आहे.  जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. जिल्ह्यात जवळपास 60 टक्के जननक्षम जोडपी  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया  व कुटुंब नियोजनाच्या अन्य साधनानी संरक्षित आहेत. अशी माहिती माता व बाल संगोपन अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


        जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. धुरी यांनी जिल्ह्यातील लोकसंख्येबाबत विस्तृत माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी २०२२ च्या तुलनेत जिल्ह्याची लोकसंख्या घटली असल्याचे सांगितले. जिल्ह्याची लोकसंख्या घनता १६३ एवढी आहे, असे सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे येथील जन्मदरच कमी असल्याचे सांगतानाच ११  ते  २४ जुलै या कालावधीत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये शस्त्रक्रिया व तांबी बसविणे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पात्र जोडप्यांना निरोध आणि संतती प्रतिबंधक संधनांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती डॉ सई धुरी यांनी आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.



जिल्ह्यात १०१८८४ जननक्षम जोडपी

       एप्रिल २०२३ मधील कुटुंब सर्व्हेनुसार जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातील एकूण जनन जोडपी १ लाख १ हजार ८८४ एवढी आहेत. त्यापैकी ४६ हजार १६७ म्हणजेच ४५.३१ टक्के जोडपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेने सुरक्षित झाली आहेत. १५ हजार ८७८ जोडपी म्हणजेच १५.५८ टक्के जोडपी तांबी, निरोध किंवा तोंडावाटे घ्यावयाच्या गोळ्याने सुरक्षित आहेत. उर्वरित ३९ हजार ८३९ जोडपी असुरक्षित आहेत. ही जोडपी कुटुंब नियोजनाची कोणतीही पद्धत वापरत नाहीत. यातील वंध्यत्व व नवविवाहित जोडपी, गरोदर वगळता असलेल्या जोडप्यांना संरक्षित करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागा पुढे आहे. 


राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये एम आर टी डी, रोटा व्हायरस, पी सी व्ही या नविन लसीचा समावेश 

       देवी रोगाचे निर्मूलनाबरोबरच पोलिओ रोगाचे निर्मूलनही अंतिम टप्प्यात असून भारत देश पोलिओ फ्री देश जाहीर झाला आहे. आता गोवर आणि रुबेला पासून संरक्षण मिळविणेसाठी एम.आर तस धनुर्वात आणि घटसर्प पासून संरक्षण मिळविणेसाठी टी.डी लस न्यूमोकोकल न्यूमोनिया पासून संरक्षण मिळविणेसाठी पी सी व्ही ही नविन तस चालू करण्यात आली आहेअशीही माहिती डॉ. धुरी यांनी दिली.