प्रश्न जिथे जनतेचा...मार्ग तिथे मनसेचा..!

Edited by:
Published on: June 24, 2023 19:05 PM
views 1176  views

सावंतवाडी : मळगावमध्ये मनसेच्या मागणीला यश आलं आहे. मळगाव हायस्कूलच्या समोर रस्त्यावर गतिरोधक घालण्यात आले. मनसे माजी मळगाव शाखाअध्यक्ष राकेश परब यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.मनसेच्या कार्यकर्त्यांचे गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी आभार मानले.

मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूलच्या समोर गतिरोधक घातले नसल्याकारणाने हायस्कूलचे समोर अपघाताचे प्रमाण वाढले होते. बऱ्याच जणांनी गतिरोधक घालण्याच्या या मागणीला जोर धरला होता.

ही बाब मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊ, राकेश परब व कार्यकर्त्यांच्या गावातल्या लोकांनी आणि शिक्षक वर्गाने निदर्शनास आणून दिले त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन देऊन गतिरोधक घालण्यास सांगितले तसेच बांधकाम विभागाने सहकार्य करून दुसऱ्या दिवशी हायस्कूलच्या समोर गतिरोधक घालून दिले त्यावेळी समोर उभे राहून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव हायस्कूलचे चेअरमन मनोहर राऊळ आणि गावातील लोकांनी भर पावसात गतिरोधक हव्या त्या जागेवर व्यवस्थित बसवून घेतले आणि हे गतिरोधक लवकरात लवकर घालून घेतल्यामुळे गावातील ग्रामस्थ हायस्कूल कमिटी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले.