संरक्षण भिंत बांधकामाच्या दर्जाची चौकशी करण्यात यावी : ॲड. जोशी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2024 12:59 PM
views 101  views

देवगड : देवगड नगरपंचायत ह‌द्दीतील गोखले घर ते तेली घर रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे अँड शामसुंदर जोशी यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीतील गोखले घर ते तेली घर या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचे काम योग्य प्रकारे व दर्जेदार पद्धतीचे होत नसून त्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.

सदर कामासाठी एकूण 14 मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीसाठी एकूण 29 लाख 24 हजार 359 एवढ्या किमतीचे व खर्चाचे अंदाजपत्रक करण्यात आलेले असून सदरचे अंदाजपत्रकातील किमतीचा आकडा पाहता तो पूर्णपणे चुकीचा भरमसाठ दर्शवण्यात आलेला आहे. सदरचे काम अंदाजे सुमारे दहा ते बारा लाख रुपयाचे असून असे असताना 29 लाख 24 हजार 359 एवढ्‌या भरमसाठ किमतीचे अंदाजपत्रक या कामासाठी कसे बनवण्यात आले. तसेच  या कामाचा दर्जा बघूनच चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.