
सावंतवाडी : ठेकेदार आणि प्रशासनाच्या कारभाराचा फटका सावंतवाडीकरांना बसत आहे. चुकीच्या पद्धतीने ग्रीट मारल्यानं अपघात होत आहेत. मागच्या चार दिवसांत अपघाताच सत्र थांबत नसून आज परिचारीकेला अपघातास सामोरं जावं लागल. यात तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासक असणारे प्रांताधिकारी हेमंत निकम आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे ? दुर्घटनांकडे ते का दुर्लक्ष करत आहेत ? की डांबरात 'धुळधाण' उडवली आहे असे सवाल नागरिक विचारत आहेत.