
सिंधुदुर्ग: अधिकाऱ्यांची जर सकारात्मक मानसिकता असेल आणि अधिकारी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतील तर अशक्य असं काहीच नाही. हे सिद्ध करून दाखवल आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यतत्पर कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी. 'कोकणसाद'ने तुंबलेल्या गटारांचा प्रश्न सर्वगोड यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावर त्यांनी तत्काळ दखल घेत हा प्रश्न मार्गी लावला आहे.
त्यांच्या या कार्यतत्परतेने गेले तीन वर्षे पेंडिंग असलेले दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर साटेली येथे तुंबलेले गटार सोमवारी मोकळे झाले आहेत. परिणामी यामुळे या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषता करुणा सदन स्कूलमध्ये याच गुडघावर पाण्यातून दररोज येजा करणाऱ्या कित्येक मायलेकांची तेथील गटार उघडे झालेने मुक्तता होणार असून हे गटार उघडे करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे कणकवली आणि आता सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे नागरिकांतून विशेष कौतुक होत आहे. दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तालुक्यातील दोडामार्ग तिलारी विजघर, बांदा - दोडामार्ग आयी या दोन्ही राज्य मार्गांच्या नूतनीकरणामुळे या मार्गावरील प्रवास खड्डेमुक्त झाला आहे. खरंतर जवळपास चार-पाच वर्षानंतर तालुक्यातील नागरिक खड्डे मुक्त रस्त्यावरून प्रवास करत आहेत. मात्र त्याच्या नेमक्या उलट म्हणजे एम. एन. जी. एल. गॅस पाईपलाईन कंपनीन पाईपलाईन साठी खोदलेली साईड पट्टी, अनेक ठिकाणी तुंबलेले गटार, राज्यमार्गाच्या साईट पट्टीवर अनेकांनी आपल्या सोयीसाठी गटार बुजून तयार केलेले जोडरस्ते, यामुळे मुख्य राज्यमार्ग खड्डे मुक्त असूनही अनेक ठिकाणी रस्त्यावर गटातील पाणी तुंबण्याचे प्रमाण सुरू होते. दोडामार्ग भेडशीतील राज्य मार्गावर आंबेली साटेली भेडशी येथेही मोठी समस्या होती. तर आयी दोडामार्ग राज्यमार्गावर मराठी शाळेजवळ सुद्धा हीच परिस्थिती होती. याप्रश्नी कोकणसादने वृत्त प्रसिद्ध करत जिल्ह्यातील बांधकामचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख असलेल्या अजयकुमार सर्वगोड यांचे लक्ष वेधले. त्याची तत्काळ दखल घेत त्यांनी सोमवारी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अनेक ठिकाणी तुंबलेले गटार उघडे करत नागरिकांना मोठा दिलासा दिला. इतकंच नव्हे तर बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर खचलेल्या साईड पट्टी खचलेल्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी काळे दगड टाकून साईड पट्टी भरून काढल्याने हा रस्ता सुद्धा वाहतूकिस निर्धोक झाला, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
खड्डे मुक्ती झालेल्या रस्त्यांना गटार मोकळे करून आणि रस्त्याच्या बाजूला वाढलेली धोकादायक झाडे तोडून बांधकाम खात्याने दिलासा दिलास खऱ्या अर्थाने बांधकाम खात्याने या वर्षी केलेल्या कामाचं चीज होणार आहे. मात्र गेली अनेक वर्षे सावंतवाडीतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांना जे जमलं नाही ते गेल्या आठ दिवसात अजयकुमार सर्वगोड यांनी करून दाखवत तेथील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.