
सावंतवाडी : सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलाचा प्रश्न सुटला आहे. उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णालयाच्या ब्रिटिशकालीन हेरिटेज इमारतीचे संवर्धन करण्यात येईल. राजघराण्याशी झालेल्या करारातून ३ एकर जागेमध्ये हॉस्पिटलची ही नवीन इमारत उभी केली जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी प्रश्न गेली ५ वर्ष जागेच्या वादात अडकला होता. याबाबत मंत्रालयात राजघराण्याशी सामंजस्य करार झाला होता. अखेर हा प्रश्न सुटला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.